Tuesday, March 27, 2007

Life येता जाता

न्युजर्सीतले बरेचसे चाकरमाने रोज न्युयार्क ला बस नी up down करतात. एकेकाळी मी ही त्या पंथातला होतो. दिवसातले अडीच तीन तास बस च्या प्रवासात व्यतित व्हायचे. पुस्तक चाळताना, TV बघताना काही संवाद, प्रसंग अथवा पात्र जशी उगाचच लक्षात रहातात तसच काहीस ह्या प्रवासा बाबतीत झाल. काहि व्यक्ती, काही प्रसंग, काही दृष्य डोक्यात चिकटली. रोजमर्याच्या प्रवासा चा कंटाळा त्या मुळे बराच सुसह्य झाला.

घरुन बस स्थानकावर कार नी जायच तीथे कार पार्क करायची आणि बस पकडायची. म्हणुन बस स्थानकाला park and ride अस ही म्हणतात. पण काही नशीबवान लोकांना कोणीतरी सोडायला आणी घ्यायाला यायचे. कधी बायकोला नवरा सोडायचा तर कधी प्रीयकराला प्रेयसी सोडायची. अस सोडताना प्रेम दाखवायच्या American रीतीनुसार निरोपा दाखल चुंबनाच आदान प्रदान व्हायच. असे सोडायला येणार्य़ा गाड्यांचा थांबा वेगळा असतो आणि त्या थांब्याला kiss and ride म्हणतात. Chris Gaston हा kiss and ride वाला होता. त्याची प्रेयसी त्याला रोज सोडायला आणि घ्यायला यायची. Chris तरूण असला तरी तब्येतीला स्थूल होता. त्याच्या प्रेयसी बद्द्ल त्याला भयंकर कौतूक होत. त्याच्या जवळ बसलेल्या सगळयांना त्याची आणि जेन ची पहिली भेट कशी झाली, त्यांनी प्रत्येक Valentine day ला कशी अनोखी भेट दिली त्या मुळे जेनी कशी भारावून गेली, जेनी त्याच्या Diet ची कशी काळाजी घेते आणी जेनीने दिलेल्या sandwich व्यतिरिक्त बाकी अबरचबर खाताना किती guilty वाटत, जेन चे Divorce घेतलेले वडील आणि जेन च्या वयाच्या त्यांच्या नव्या बायको बरोबर vacation ला किती मजा आली ह्याच इथंभूत वर्णन करून सांगीतल होत. Chris बरोबर बसायला मजा वाटायची त्याच्या बडबडीत वेळ पटकन निघून जायचा. काही दिवसानी Chris बस मधे यायचा बंद झाला. एक दिवस मला उशीर झाल्या मुळे दुसरी बस पकडावी लागली. आणि Chris येताना दिसला. वजन वाढल होत. त्याने ओळख दाखवली नाही. असो, एक गोष्ट मात्र खटकली. Chris आता park and ride वाला झाला होता.

बसचे बहुतेक प्रवासी ठरावीक असायचे काहीं प्रवाश्यांची नाव कळायची तर काहींना मी नाव द्यायचो. असच एकीच मी नाव ठेवल होत हेलन. कारण ती हेलन सारखीच दिसायची. अस वाटायच कि ही कधी ही उठून ‘पिया तू अब तो आजा’ गाणार. हेलन अमेरीकन चायनीज होती. अमेरीकन जास्त आणि चायनीज कमी. मुळात काळ्या केसाला तीनी खोटा Blonde रंग दिला होता. पापणीवर नीळसर eyeshadow आणि मस्कारा, ओलसर लिप्स्टीक आणी चेहेर्यावर मादक भाव. सकाळी सात वाजता तीच रूप रात्रीच्या धूंद पार्टीला जाण्याच्या तयारीतल वाटायच. कसल्या प्रकाराची नोकरी असेल तीची ह्या बद्द्ल मी कयास बांधायचो. ती secretary असावी, नाही ती Hotel ची receptionist असावी, बहुतेक ती Bar मधली Dancer असावी नाही तर escort service देणारी असावी. एकदा वाटल ती कूठ उतरते ते बघाव आणी नक्की कुठे नोकरी करते ह्याचा शहनीशा करावा. पण ज्या वेगाने तो विचार मनात आला त्याच वेगाने विरून ही गेला. एक दिवस बस stop वर दोन तीन लहान मुली दिसल्या. लक्षात आल की त्या दिवशी Bring your daughter to work day होता. बस सुरू व्हायच्या आधी हेलन धावत आली. तीच्या बरोबर तिची १० वर्षाची मुलगी होती. ह्या चायनीज पोरींचा साला वयाचा अंदाजच बांधता येत नाही. हेलन च्या मुलीच्या मिचमिच्या डोळ्यात अफ़ाट कुतुहल होत आणी हेलन कौतुकानी तीच्या प्रत्येक प्रष्णा च उत्तर देत होती. त्या दिवशी एक कळल की हेलन एक आई होती. आणी तिची नोकरी नक्कीच अशी असावी की तिथे ती आपल्या १० वर्षाच्या मुलीला निसंकोच घेउन जाऊ शकत होती.

बस मधले काही प्रवासी नेहेमीचे तर काही पाहुणे कलाकारासारखे येऊन जाऊन असायचे. नेहेमी च्या प्रवाशां मधे एक होती केली. सगळ्या बस ला तीच नाव माहिती होत. ही कृष्णवर्णाची महिला इतकी विशाल होती की तीला बसायला दोन सलग सीट लागायच्या. बिचारीला कधी कधी निव्व्ळ दोन सीट नसल्या मुळे बस सोडावी लागायची. दुसरा होता Mr. Landof. तो बस मधे office च थाटायचा. त्याला शेजारची सीट मोकळी हवी असायची. कोणी शेजारी येऊन बसल की तो वैतागायचा. बस मुक्कामी पोहोचे पर्यंत त्याची सकाळच्या सगळ्या emails ना उत्तर देऊन झाल असायच. तीसर्या रांगेत तल्या डावी काडच्या सीट वर बहुतेक वेळेस चो ई आणि त्याची बायको बस मधे सकाळचा नाश्ता करायचे. कधी ऒल्ड पीट बस चालवायला असायचा. माणूस अतिशय प्रेमळ. सगळ्यांची चौकशी करायचा. पण तो आला की लोक वैतागायचे कारण तो बस हळू चालवायचा.

आजुबाजु च्या परिसरात देशी लोकांची वसाहत वाढू लागली तशी बस मधल्या देशी प्रवाश्यांची संख्या ही वाढली. ह्या देशी जनतेत एक होती ममता ( अर्थात मी ठेवलेल नाव ). दोन तीन आठवडेच बस ला होती. आलीच ती चेहर्यावर अवघडलेला भाव घेऊन. ज्या स्थितित ती होती त्याला अनुसरून ममता बस मधे रोज Baby is Born नावा च पुस्तक वाचायची. एकदा तीच्या मागे बसलेला असताना मला लक्षात आल की त्या चकचकीत पुस्त्काच्या आत भारतात छापलेली गुजराती पुस्तीका होती ज्याच्यात सुमार अस्पष्ट चित्रां मधून बाल जन्माच्या रहस्याच वर्णन होत. शेवटी ज्याचा त्याचा विश्वासाचा प्रश्न असतो. अत्याधूनिक छ्पाई आणि शास्त्रीय माहीती असलेल पुस्तका पेक्षा ममताला मायदेशातून आलेली ती साधारण पुस्तीका अधीक आधाराची वाटत होती. कदाचित ते पुस्तक तिच्या आईने दिले असावे. And that makes all the difference. दुसरा लक्शात राहिलेला देशी होता कन्ना चेरबूल. कृष्णवर्णिय माणूस. बस मधे बसला कि आधी पोथी वाचायचा आणि मग टण टणीत आवाजात cell phone वर जे संभाषण चालू करायचा कि सगळी बस परेशान व्हायची. तो काय बोलतो आहे हे कळल असत तर कदाचित एव्हढा त्रास नसता झाला. पण बस मधे त्याची भाषा फार कमी लोकांना कळायची. त्याच्या टणटणीत आवाजाने डोक ऊठायच. खुप दिवस लोक सहन करत राहिली. देशी असल्यामुळे मला उगाचच guilty वाटायच. शेवटी एक दिवस बस मधे ठळक पाटी लागली. Emergency असल्या शिवाय cellphone वापरू नये. अर्थात त्या पाटी च कन्ना ला सोयर सुतक न्हवत. त्याचा संवाद त्याच जोमाने सुरू राहिला. पण मग एक दिवस एका प्रवाश्यानी कन्नाला ती पाटी दाखवून हटकल. नेमक त्या दिवशीच कन्ना accident मधे सापडलेल्या बायकोशी बोलत होता. तो प्रवासी खजील झाला. पण त्या दिवसानंतर कन्ना चा टणटणीत स्वर मंदावला.

बसच्या आत जस एक विश्व होत तस बसच्या खीडकी बाहेर ही एक अनोख विश्व होत. न्यूजर्सी टर्नपाईक वर धावणार्या बस च्या खीडकीतून वेगवान आयुष्याची अनोखी प्रचिती यायची. १२ लेन च्या हायवे वर वहानांचा प्रचंड ओघ, फ़्लाय ओवर वरून जाणारी ऐअर ट्रेन दुरच्या पुला वरुन जाणारी Path train, एका बाजूला एलिझाबेथ पोर्ट वर शीरणारे मालवाहू जहाज तर दुसर्या बाजूला निवार्क च्या ऐअर्पोर्ट वरून विमाना चे एकामागून एक ऊड्डाण. एका दृष्टीक्षेपात गतीची विविध रूप डोळ्या पुढे झळकायची. कधी त्याच बसच्या खीडकीतून दिसायचा जागच्या जागी खीळलेला चक्का जाम. रस्त्या वर दूर वर खिळलेली वहान. वहानातले अस्वस्थ हतबल प्रवासी आणी उतरण्याची वाट पहात आकाशात ताट्कळलेली विमानांची रांग. ह्याच खीडकी तून रुतू चक्राचे विविध दर्शन व्हायचे. हिवाळ्यात मीठा च्या चिखलात लडबडलेले रस्ते दिसायचे तर कधी पिठी साखरे सारखा पसरलेला स्नो. वसंत रुतूत हिवाळ्यात हाडाची काड काढलेल्या झाडांवर नव्या चैतन्याची पालवी फ़ूटलेली दिसायची. ग्रीष्मात हिरवळीची श्रीमंती दिसायची आणि दिसायचे चकचकीत नीळसर निरभ्र आकाश.

सेप्टेंबर चा असाच एक दिवस होता आणि आकाश चकचकीत नीळसर निरभ्र होते. आकाशात चमकणारे विमान होते. बसने टर्नपाईक ओलांडले आणि Lincoln Tunnel मधुन midtown Manhattan मधे बाहेर पडली. डुलकी काढणारे जागे झाले.

आज काहितरी वेगळ होत. काय ते कळेना पण आज काहितरी वेगळ होत. रस्त्यावरुन Fire engines किंचाळत down town च्या दिशेला सुसाट धावत होती. बस मधल्या एका ने माहिती दिली की World Trade Center वर विमान आदळले. लोकात थोडी कुजबुज झाली. बस Driver ने सांगीतल की बस नेहेमी च्या थांब्या पासून अलिकडे थांबेल. मी बस मधून उतरून चालत office मधे गेलो. Office च्या खीडकीतून World Trade Center चे Towers स्पष्ट दिसत होते. एका Tower मधून प्रचंड धूर येत होता. अचानक एक विमान आले आणू दुसर्या Tower ला धडक दिली. हा अपघात नव्हता. हे काहितरी भयंकर हादरवणार होत. Office मधे हलकल्लोळ माजला. लोक फ़ोन करू लागले पण फ़ोन लागेना. Cell phones काम करेना. Dorie अचानक रडू लागली. तीच्या नवर्याची सकाळी WTC मधे meeting होती आणी त्याचा फ़ोन लागत न्हवता. भांबावलेले रडके चेहरे speaker वरचे आदेश पाळत इमारतीच्या बाहेर पडू लागले. संपूर्ण जगाला हादरवून टाकणार्या दिवसा ची सुरवात झाली होती……..

त्या दिवशी परत येताना बस न्हवती.

नंतर कित्येक दिवस त्या घटने चे पडसाद उमटत राहिले. एक दिवस बस मधून रात्री परत येताना खीडकी तून पाहीले. WTC च्या जागी खोल विवरातून आकाशाला भीडणारे दोन प्रकाश झोत दिसत होते.

बरेच दिवसानी माझी नोकरीची जागा बदलली. माझ बस मधून येण जाण ही सूटल. कधी कधी बस मधली माणस आठवता, काही प्रसंग आठवतात आणि मग September चा तो दिवस आठवतोआणि मग बस बद्द्ल बाकी काहिच आठवत नाही
.

No comments: