Sunday, February 8, 2009

शुक्रा आणि मंग्या

शुक्रा आणि मंग्या कोण ?
एक वानरी आणि वानर
लाडात आले बागेत गेले
मोहाच्या वॄक्षा खाली
Adam आणि Eve झाले
पाप पुण्या ची जाण आली
देव उमगला, दिव्यत्व आले
शुक्रा ची सीता झाली
मंग्यातल्या रामाला वरले
काळाचा पहिला डावाने
मंग्याला बळ दिले
शुक्राला अबला केले
मग युतीचे घोळ झाले
मंग्या ने शुक्रा चे हरण केले
शुक्रा ने मंग्याचे पाणी ग्रहण केले
शुक्रा ची कधी पांचाली झाली
तर मंग्या झाला अबलांचा स्वामी
अशा बेबंद काळातली
एक छवी आगळी होती
मंग्याचा बासरी च्या सूरात
शुक्रा त्याची राधा होती.
पुढे शक्तीबला चे प्रयोग झाले
युद्ध झाले, विनाश झाले
परचक्र आले स्वातंत्र गेले
वहात्या काळाच्या ओघात
शुक्रा मंग्या बदलत गेले
एका रात्री शुक्र तारा मंद वारा
मंग्या शुक्रा ला म्हणाला
चलती क्या तू नौ से बारा
सिनेमाच्या जादूत हरपले भान
शुक्रा मंग्याच्या कानात म्हणाली
हम दो बदन एक जान
काळ बदलला, डाव बदलला
गुलामी सरली स्वराज्य आले
चतूर कटाक्षा पुढे बळ हरले
शुक्रा चे पाऊल आता
मंग्या च्या पावला वर पडले
मग ठेचे वर ठेच ठेचे वर ठेच
आता मंग्याच का शुक्रा का नाही
शुक्राच का मंग्या का नाही
शुक्रा च्या मनातल कोड
मंग्याला का सोडवत नाही
मंग्या ची खूशहाली
शुक्राला का बघवत नाही
काळाची गति कळत नाही
आता ऐकतो गमती साठी मंग्याला चंद्या ही चालतो
शुक्राला सहेली सारखा सैया लागतो
काय सांगाव पुढे असे दिवस येतील
मंग्या शुक्रा आपापल्या ग्रही जातील?

No comments: